वाडा रुग्णालयात डॉक्टरला शिवीगाळ
वाडा रुग्णालयात डॉक्टरला शिवीगाळ
श्रमजीवीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांकडून कामबंदचा इशारा
वाडा, ता. १२ (बातमीदार) ः वाडा ग्रामीण रुग्णालयातातील स्त्रीरोगतज्ज्ञ महिलेला श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ केली होती. या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालयातातील कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई झाली नाहीतर बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सोनोग्राफी सुरू असताना काही महिलांनी आपला क्रमांक इतरांना दिल्याचा आरोप करीत वाद घातला होता. त्यानंतर सोनोग्राफीसाठी आलेल्या एका गरोदर महिलेला अचानक चक्कर आल्याची घटना घडली. या वेळी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपचारात हलगर्जी केल्याचा आरोप करीत थेट वरिष्ठांकडे तक्रार केली. या वेळी वैद्यकीय अधिकारी कक्षातील डॉ. हर्षदा पाटील यांना शिवीगाळ करण्यात आली होती. या प्रकरणात श्रमजीवी संघटनेचे वाडा तालुकाध्यक्ष भरत जाधव, सचिव सूरज दळवी, बाळू लहांगे, सुजाता पारधी, मिरा टोकरेसह १५ ते २० आरोपींवर वाडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम १८९(२), १९०, २२१, ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेचा ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध केला. तसेच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यावर तत्काळ कारवाई झाली नाहीतर बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यादव शेखरे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

