जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी पुस्तकावर परिसंवाद
‘जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी’ पुस्तकावर परिसंवाद
नेरूळ, ता. १२ (बातमीदार) : नवरंग साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ, नवी मुंबई यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता ‘जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी’ या काशिनाथ मढवी लिखित पुस्तकावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात नवरंगचे कार्यवाह घनश्याम परकाळे हे लेखक काशिनाथ मढवी यांची मुलाखत घेणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, प्रशासन कौशल्य आणि जागतिक स्तरावरील राजकीय महत्त्व यावर सखोल चर्चा होणार आहे. हा कार्यक्रम पुष्पपर्णी नर्सरी, नेरूळ पूर्व, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे. साहित्यप्रेमी व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गजानन म्हात्रे यांनी केले आहे.
-----------------------------------------------------------
नेरूळ येथील तडे गेलेली बुद्धमूर्ती बदलण्याची मागणी
नेरूळ, ता. १२ (बातमीदार) : नेरूळ येथील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ परिसरात गेल्या वर्षी नव्याने उभारण्यात आलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्तीला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. ही मूर्ती तत्काळ बदलावी तसेच तिच्या नियमित देखभालीसाठी कायमस्वरूपी शासकीय कर्मचारी नेमावा, अशी मागणी नवी मुंबईतील रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष वीरेंद्र लगाडे यांनी महापौर सुजाता पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या मूर्तीला तडे गेल्यामुळे स्मारकाच्या कामात निकृष्ट दर्जा वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, संबंधित कामाची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी रिपब्लिकन सेनेकडून करण्यात आली आहे. या वेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

