जुन्या मुंबई पुणे महामार्गावर तेल गळतीमुळे अपघात
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तेलगळतीमुळे अपघात
खालापूर, ता. १२ (बातमीदार) : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टँकरमधून झालेल्या तेलगळतीमुळे अपघाताची घटना घडली. बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजता विनेगाव हद्दीत (एमएच-०४ एफपी-१७०१) क्रमांकाच्या टँकरचा ॲक्सल तुटल्याने चालकाने टँकर रस्त्यावरच उभा केला होता. त्या वेळी टँकरमधील तेल रस्त्यावर सांडले; मात्र चालकाने कोणतीही बॅरिकेडिंग किंवा खबरदारीची उपाययोजना केली नाही. परिणामी, मागून येणारी इको कार सांडलेल्या तेलावर घसरून अपघातग्रस्त झाली. या घटनेत कारचे नुकसान झाले. इको चालकाच्या तक्रारीवरून खालापूर पोलिस ठाण्यात टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार रवि सोनावणे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

