स्थायी समितीबाबत मुख्यमंत्र्यांची भुमिका लवचिक

स्थायी समितीबाबत मुख्यमंत्र्यांची भुमिका लवचिक

Published on

स्थायी समितीबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका लवचिक
भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई महापालिकेत महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांना स्थायी समितीचे आलटून पालटून अध्यक्षपद मिळावे, याबाबत मुख्यमंत्र्यांची लवचिक भूमिका असून त्याबाबतचा निर्णय १७ ते १८ फेब्रुवारीपर्यंत होणार असल्याची माहिती शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी दिली.

स्थायी समिती पहिल्या किंवा शेवटच्या एक वर्षासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाला दिली जावी, याबाबत चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करीत असून, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका लवचिक आणि सकारात्मक असल्याचे गटनेते घोले यांनी सांगितले. दोन्ही पक्षांत सामोपचाराने चर्चा सुरू असून, येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत निर्णय होईल, असेही त्यांनी सागितले.

पालिकेची सुधार समिती आणि बेस्ट समिती शिवसेना (शिंदे) पक्षाला मिळणार आहे. संख्याबळानुसार समित्यांत महायुतीसह इतर पक्षांना वाटा मिळणार आहे. महायुतीकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे महत्त्वाच्या वैधानिक आणि विशेष समित्या भाजपा-शिवसेनेच्या वर्चस्वाखाली असतील.
------------
पक्षीय बलाबल
भाजप : ८९
शिवसेना (ठाकरे गट) : ६५
काँग्रेस : २४
शिवसेना (शिंदे) पक्ष : २९
मनसे : ६
एमआयएम : ८
समाजवादी पक्ष : २
राष्‍ट्रवादी काॅँग्रेस (शरदचंद्र पवार) : १
राष्‍ट्रवादी काॅँग्रेस (अजित पवार) : ३

--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com