अपघातात दुचाकीस्वार ठार
अपघातात दुचाकीस्वार ठार
मनोर, ता. १२ : येथील वरई-पारगाव रस्त्यावरील दहिसर गावात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मुकेश प्रकाश पारधी (वय २८) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून, तो मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावातील रहिवासी होता. गुरुवार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. मुकेश दुचाकीवरून वरई येथून पारगावच्या दिशेने जात असताना दहिसर तर्फे मनोर गावाच्या हद्दीत दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोरून येणाऱ्या कारला धडकून अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुकेश पारधी याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मुकेशच्या अपघाती मृत्यूने पारधी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मनोर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

