

भिवंडी पालिका महापौरपदाची निवडणूक २० फेब्रुवारीला
भिवंडी, ता. १२ ः मागील कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक २० फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली आहे. महापौर व उपमहापौरपदासाठी १६ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ५ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ आहे. तर या पदांसाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजता स्व. विलासराव देशमुख सभागृहात या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी हे पीठासीन अधिकारी असणार आहेत.
मागील महिन्याभरापासून वेध लागलेल्या भिवंडी मनपा महापौरपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मागील महिनाभरापासून भिवंडी महापालिका महापौरपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यातच सर्वच राजकीय पक्षांमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच व आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक जाहीर झाल्याने नेमकी कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते, हे २० फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.