शिवरायांचे १२ किल्ले वारसा यादीत

शिवरायांचे १२ किल्ले वारसा यादीत

Published on

शिवरायांचे १२ किल्ले वारसा यादीत
ॲड. शेलार यांनी स्वीकारले प्रमाणपत्र
मुंबई, ता. १२ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिल्यानंतर त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्वीकारले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान स्वीकारताना आज ऊर भरून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांचे तमाम महाराष्ट्राच्या वतीने मंत्री ॲड. शेलार यांनी आभार मानले. हा महाराष्ट्र, देश आणि शिवप्रेमींसाठी गौरवाचा क्षण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या वेळी मंत्री ॲड. शेलार यांनी युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारलेल्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. २६ नोव्हेंबर २०२५ला संविधान दिनानिमित्त पुतळ्याची स्थापना युनेस्कोच्या मुख्यालयात करण्यात आली आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि शिक्षणाद्वारे सक्षमीकरण यांची डॉ. आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही युनेस्कोच्या मूलभूत ध्येयाशी सुसंगत असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी म्हटले आहे. या वेळी विशाल शर्मा यांच्यासह विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक हेमंत दळवी उपस्थित होते.
---
१२ किल्ले कोणते?
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूमधील जिंजी या १२ किल्ल्यांचा समूह ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com