

पनवेलमध्ये स्कूल बस-टेम्पोचा अपघात
दोन शाळकरी विद्यार्थी जखमी
पनवेल, ता. १२ (वार्ताहर) : पुणे-मुंबई हायवेवर गुरुवारी दुपारी एका भरधाव टेम्पोने स्कूल बसला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले असून, यातील आठ वर्षीय चिमुरडीला गंभीर दुखापत झाली आहे. पनवेल शहर पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी दुपारी ओएनजीसीतील शाळा सुटल्यानंतर स्कूल बसचालक संदीप मोहिते हा शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बसमधून पळस्पे येथील घरी सोडण्यास घेऊन जात होता. दुपारी २च्या सुमारास मुंबई-पुणे हायवेवरील पारपुंड गाव येथील वेलकम हॉटेलसमोर ही स्कूल बस आली असताना मुंबईहून येणाऱ्या भरधाव टेम्पोचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून स्कूल बसला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात स्कूल बसमधील
अन्वी मौर्य (८) आणि दक्ष नायर (१६) हे दोन विद्यार्थी जखमी झाले.
या अपघातात अन्वी हिला गंभीर दुखापत झाली असून, ती पळस्पे फाटा येथील मॅरेथॉन सोसायटीत राहते आणि इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. या अपघातानंतर पनवेल शहर पोलिसांनी टेम्पोचालक मिलिंद सपकाळ (४३) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (२) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला बीएनएसएस कलम ३५ (३) नुसार नोटीस बजावली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पोवार या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.