यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार जाहीर
यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार जाहीर
मुंबई, ता. १३ ः महाराष्ट्र सरकारकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मयास यशवंतराव चव्हाण यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार आज जाहीर झाले. परीक्षण समितीने २०२४ वर्षासाठी प्राप्त प्रवेशिकांतून ही निवड केली. प्रौढ वाङ्मयास २२ (प्रत्येकी एक लक्ष रुपये), बाल वाङ्मयास सहा (प्रत्येकी ५० हजार रुपये), प्रथम प्रकाशनास सहा (प्रत्येकी ५० हजार रुपये) आणि सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार एक (एक लक्ष रुपये) असे एकूण ३५ पुरस्कार घोषित करण्यात आले.
...
प्रौढ वाङ्मय पुरस्कार
कवी केशवसुत पुरस्कार- सुनीता डागा (तुझं शहर हजारो मैलांवर), राम गणेश गडकरी पुरस्कार- गणपत गायकवाड (रायगडावरून राजगृहाकडे), हरी नारायण आपटे पुरस्कार- हिनाकौसर खान (इत्रनामा), दिवाकर कृष्ण पुरस्कार- डॉ. पद्मनाभ केसकर (हॅल्युसिनेशन्स) अनंत काणेकर पुरस्कार- सानिया (काही आत्मिक... काही सामाजिक) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार- सारिका कुलकर्णी (बे दुणे पाच!), न. चिं. केळकर पुरस्कार मृणालिनी चितळे (निलू निरंजना : गोष्ट हिची पृथ्वीमोलाची), लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार- युनूस सय्यद (इनुची गोष्ट), श्री. के . क्षीरसागर पुरस्कार- विनय नारकर (वस्त्रगाथा), शाहू महाराज पुरस्कार - मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (अपराजिता गाथा वीरांगनांची), नरहर कुरुंदकर पुरस्कार - सलील वाघमारे (मराठी भाषा ः लेखन मार्गदर्शन), महात्मा जोतीराव फुले पुरस्कार - प्रा. डाॅ. चंद्राकांत सहस्रबुद्धे (कल्पनेचा काजवा), वसंतराव नाईक पुरस्कार - मयूर बागुल (सर्जक), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार - डाॅ. सिल्केशा अहिरे (शांताबाई दाणी- भीम मळ्यातील सूर्यफुल), सी. डी. देशमुुख पुरस्कार - अभिजित जोग (ब्रॅंडनामा २.०), ना. गो. नांदापूरकर पुरस्कार- वसु भारद्वाज (भारतीय तत्त्वज्ञान स्वरूप आणि सिद्धांत), कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार- स्मिता गाैड (माझे शाळेतले प्रयोग), डाॅ. पंजाबराव देशमुख पुरस्कार - संतोष शिंत्रे (पैस पर्यावरण संवादाचा), रा. ना. चव्हाण पुरस्कार - संपादक प्रफुल्ल शिलेदार (अरुण कोलटकर), तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार - अनुवादक मेघना भुस्कुटे (भारतीय भाषांची अनोख कहाणी), भाई माधवराव बागल पुरस्कार- भानू काळे (अंतर्नाद ः एका मासिकाचा उदयास्त).
...
बाल वाङ्मय पुरस्कार
बालकवी पुरस्कार- अशोक कोतवाल (गाऊ आनंदाचे गाणे), भा. रा. भागवत पुरस्कार- जयेश मिस्त्री (जादूचा दिवा), साने गुरूजी पुरस्कार- सुरेश वांदिले (१६९५ स्मार्ट रोबो एआय आणि औरंगजेब), राजा मंगळवेढेकर पुरस्कार- जितेंद्र कुवर (चिंचेवरलं भूत आणि इतर गोष्टी), यदुनाथ थत्ते पुरस्कार- डाॅ. उमेश करंबळेकर (चारा खा, पाणी प्या अन् भुर्र...), ना. धो. ताम्हणकर पुरस्कार- पृथ्वीराज तौर (हाक शांततेसाठी).
...
प्रथम प्रकाशन पुरस्कार
बहिणाबाई चौधरी पुरस्कार- सचिन शिंदे (पातीवरल्या बाया), श्री. ना. पेंडसे पुरस्कार- अलका मोकाशी (गुंतवळ), ग. ल. ठोकळ पुरस्कार- विजय शिरसाठ (दिव्याखालचा दिवा), ताराबाई शिंदे पुरस्कार- ऋतुराज कशेळकर (कलंदर बिलंदर), रा. भा. पाटणकर पुरस्कार- महेश शेट्ये (जी. ए. : द लाॅस्ट पॅराडाईज).
...
सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार
सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार- प्रा. डाॅ. शुभदा शहा (घाल घाल पिंगा वाऱ्या...)

