लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
शहापूर, ता. १४ (वार्ताहर) : घरपट्टी हस्तांतरण करून नव्याने नावावर करण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हिरामण तरवारे यांनी तक्रारदाराकडे साडेतीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराच्या पत्नीने आसनगाव ग्रामपंचायत हद्दीत घर खरेदी केले होते. संबंधित घराची घरपट्टी त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी तरवारे यांनी साडेतीन हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीअंती तीन हजार रुपये स्वीकारण्यावर निश्चिती झाल्याचेही समोर आले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती. विभागाने नोव्हेंबर २०२५ तसेच फेब्रुवारी २०२६ मध्ये सापळा रचला होता. प्रत्यक्ष लाच स्वीकारली नसली तरी २९ ऑक्टोबर २०२५ मध्ये कार्यालयात लाच मागितल्याचे डिजिटल तसेच इतर पुराव्यांच्या आधारे चौकशीत स्पष्ट झाले. या पुराव्यांच्या आधारे अखेर गुरुवारी (ता. १२) रात्री उशिरा हिरामण तरवारे यांच्याविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

