जिल्हा परिषद शाळेत संस्कृतीचा उस्तव

जिल्हा परिषद शाळेत संस्कृतीचा उस्तव

Published on

जिल्हा परिषद शाळेत संस्कृतीचा उत्सव
- विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कासा, ता. १४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा जिल्हा परिषद शाळा येथे दोनदिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करणे तसेच अभ्यासाबरोबरच स्टेज डेरिंग, सादरीकरण कौशल्ये आत्मसात व्हावीत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांत समूहगीते, नृत्य, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण झाले. अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कला सादर केली. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमावेळी बोलताना उपसरपंच हरेश मुकणे म्हणाले, की १९३५ साली सुरू झालेल्या या जिल्हा परिषद शाळेची सातत्याने प्रगती होत आहे. आज अनेक पालक इंग्रजी माध्यमाकडे वळत असले तरी कासा जिल्हा परिषद शाळा आपला शैक्षणिक दर्जा टिकवून आहे. त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. गुरुवारी (ता. १२) झालेल्या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास लोखंडे, सरपंच देशमुख, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र पवार, प्रभारी मुख्याध्यापक गीता भावर, माजी पंचायत समिती सदस्य राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

--------------
चौकट
शाळेत चांगली पटसंख्या
सध्या अनेक जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या चर्चा सुरू असताना, कासा येथील शाळेचे चित्र मात्र वेगळे दिसून येत आहे. पहिली ते चौथीपर्यंत एकूण ४४७ विद्यार्थ्यांची पटसंख्या असून, ते येथे नियमित शिक्षण घेतात. यातील बहुसंख्य विद्यार्थी आदिवासी समाजातील आहेत. यासोबतच शिक्षक, व्यापारी व मध्यमवर्गीय पालकांची मुलेही येथे शिकत असल्याने शाळेवरील विश्वास दृढ झाल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com