अनोखे विज्ञान प्रदर्शन

अनोखे विज्ञान प्रदर्शन

Published on

अध्यात्मातून विज्ञानाकडे
अनोख्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

विरार, ता. १४ (बातमीदार) : विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या उत्कर्ष विद्यालय पूर्व प्राथमिक विभाग मराठी माध्यमात दोनदिवसीय अनोख्या विज्ञान व कार्यानुभव प्रदर्शन घेण्यात आले.
सृजनशीलता, संस्कृती, विज्ञान, अध्यात्म यांचा मिलाफ या प्रदर्शनात पाहायला मिळाला. संस्थेचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, सचिव अपर्णा ठाकूर यांनी प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनाला संस्थेचे खजिनदार शिखर ठाकूर, संस्थेच्या पदाधिकारी धन्वी सोलंकी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेचे समन्वयक नारायण कुट्टी, मार्गदर्शिका कल्पना राऊत यांनीही प्रदर्शनाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी विवा महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा वर्मा, उत्कर्ष विद्यालय माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व विवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या चित्रा ठाकूर, उत्कर्ष इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष तिवारी तसेच प्रदर्शनाचे परीक्षण करणाऱ्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका किरण देशमुख, पर्यवेक्षिका स्मिताली राऊत, ज्येष्ठ शिक्षिका सुगंधा वर्तक उपस्थित होते. पूर्व प्राथमिक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भक्ती वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन या प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले होते.
-------------------
चौकट
नावीन्यपूर्ण, कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन

संस्कृती दर्पण दालनामध्ये सण, संस्कृती व अध्यात्म यांचा समन्वय साधत प्रतिकृती मांडल्या होत्या. बालवाटिकेतील विद्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने त्याचे सादरीकरण करीत होते. अष्टांग दर्पण या दालनामध्ये मानवी शरीराचा अध्यात्माशी अगदी ऋषीमुनींच्या काळापासून जोडलेली नाळ बालवैज्ञानिकांनी या वेळी उलगडून दाखवली. तसेच कला दर्पणच्या तिसऱ्या दालनामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पालकांच्या मदतीने बनविलेल्या नावीन्यपूर्ण, कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com