जुनी बाजारपेठ रस्त्याच्या कॉर्नरवर जीवघेणा खड्डा
खड्ड्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका
रहिवाशांची जुनी बाजारपेठ रस्त्याच्या डागडुजीची मागणी
विक्रमगड, ता. १४ (बातमीदार) : विक्रमगड नगरपंचायतअंतर्गत जुन्या बाजारपेठेतील रस्त्याच्या एका वळणावर जीवघेणा मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावरून असंख्य वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या खड्ड्यामुळे अपघाताची भीती नागरिकांनी वर्तविली असून, लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विक्रमगड तालुक्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशात विविध कामांनिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक नागरिक या जुन्या बाजारपेठेतील रस्त्याचा वापर करतात. येथील रस्ता हा नगरपंचायतीअंतर्गत येत असून, त्यावर काही ठिकाणी मोठे खड्डे पडल आहेत. त्यातील एका वळणावरील खड्डा भला मोठा असून, सकाळी किंवा रात्रीच्या अंधारात त्यावरून एखादे दुचाकी किंवा चारचाकी वाहन गेल्यास अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तविली आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याआधी प्रशासनाने या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणीदेखील येथील नागरिक करीत आहेत.
-----------
चौकट
गतिरोधकाची मागणी
फक्त रस्त्याची डागडुजीच नाही तर येथील पतंगेश्वर महादेव मंदिर ते जुन्या ग्रामपंचायतीपर्यंतच्या रस्त्यावर किमान चार गतिरोधक तयार करावे, ही मागणीही नागरिकांतर्फे करण्यात आली आहे. या रस्त्यावरील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा वावर पाहता येथे गतिरोधक असावेत, असे नागरिकांना वाटते.
------------
प्रतिक्रिया-
हा रस्ता नगरपंचायतीअंतर्गत येतो. येथे आता वाहनांची वर्दळही पाहण्यास मिळते. त्यात रस्त्यात पडलेले खड्डे पाहता येथे एखादा अपघात होऊ शकतो. त्यामुळे हे खड्डे लवकर बुजवावे, अशी आमची मागणी आहे.
- रंजीत भानुशाली (रहिवासी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

