आर दक्षिण विभागाच्या कारवाईत मथुरादास मार्ग झाला विस्तीर्ण

आर दक्षिण विभागाच्या कारवाईत मथुरादास मार्ग झाला विस्तीर्ण

Published on

आर दक्षिण विभागाच्या कारवाईत मथुरादास मार्ग झाला विस्तीर्ण
दुकानांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांवर तोडक कारवाई; वाहतुकीला दिलासा
कांदिवली, ता. १४ (बातमीदार) ः कांदिवली येथील आर दक्षिण विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद मार्ग आणि मथुरादास मार्ग यांच्या वळणावर असलेल्या दुकानांच्या अनधिकृत वाढीव बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वळणावरील मार्ग मोकळा झाल्याने वाहतुकीच्या कोंडीत काही प्रमाणात घट झाली असून वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
ही कारवाई उपायुक्त (परिमंडळ ७) संध्या नांदेडकर तसेच सहाय्यक आयुक्त आरती गोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शुक्रवारी (ता. १३) सकाळी ९ ते १० या वेळेत सुमारे एका तासाच्या मोहिमेत १० दुकानांवरील अनधिकृत वाढीव बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. कांदिवली पश्चिमेतील स्वामी विवेकानंद मार्ग आणि मथुरादास मार्ग हे दोन्ही प्रमुख मार्ग मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी ओळखले जातात. या मार्गांलगत असलेल्या काही दुकानदारांनी दुकानासमोर अनधिकृत बांधकाम, छप्पर व शेड उभारल्याने दोन्ही मार्गांना जोडणाऱ्या वळणावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. सहाय्यक अभियंता अमोल गावित आणि रस्ते विभागाचे अभियंता विकास पटले यांच्या देखरेखीखाली दोन जेसीबी, चार ट्रक आणि सुमारे ३३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अभियंता विकास पटले यांनी सांगितले, की स्वामी विवेकानंद मार्ग आणि मथुरादास मार्गाच्या वळणावरील दुकानांच्या अनधिकृत वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होऊन वाहनचालक व प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com