महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र भुवनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र भुवनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) ः श्रीक्षेत्र भुवनेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भुवनेश्वर मंदिर ट्रस्ट, १८ गाव समिती, चिंचवली-नारंगी यांच्या वतीने रविवारी (ता.१५) विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. तसेच १८ गावांच्या हद्दीत नागरिकांना २४ तास तत्पर वैद्यकीय सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी आणि महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यासह कला व क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थ्यांचाही गुणगौरव होणार आहे. याशिवाय संगीत भजनांचे कार्यक्रम व सौरऊर्जा जनित्र उपकरणाचे श्रीचरणी लोकार्पण पेढांब्याच्या मंगल ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी वाघ्रणचे विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ आणि माणकुले येथील श्रीदत्तकृपा प्रासादिक महिला भजन मंडळातर्फे भजने सादर होणार आहेत. दुपारी जय भवानी मंडळ, रामपाडा-वैजाली-हाशिवरे यांचे सुमधुर भजन व बालकलाकर यांचे किलबील गुंजन होणार आहे. सायंकाळी दीपमाळ व आरती होणार असून, पालखी सोहळाप्रित्यर्थ भजन मंडळ रांजणखारचे बुवा शंकर पाटील, सुरेश पाटील व सुरेंद्र म्हात्रे आणि सर्व भाविक मंडळी यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री पालखी सोहळा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

