सिडकोची संथ गती

सिडकोची संथ गती

Published on

सिडकोची संथ गती
नेरूळ स्थानकातील प्रलंबित कामांवर नामदेव भगत यांची नाराजी; सरकत्या जिन्यांचा प्रश्न २०१८ पासून रखडला
नेरूळ, ता. १४ (बातमीदार) : नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातील प्रलंबित कामे, अस्वच्छता आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाच्या संथ कारभारावर माजी सिडको संचालक तथा माजी विरोधी पक्षनेते नामदेव भगत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ८ डिसेंबर २०२५ला सिडकोचे मुख्य अभियंता प्रभाकर फुलारे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्थानकातील विविध प्रश्नांवर निर्णय घेण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटूनही कोणतीही ठोस अंमलबजावणी न झाल्याने भगत यांनी प्रशासनाला लेखी पत्र पाठवत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. स्थानक परिसरातील अस्वच्छता, पोलिस चौकीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा मुद्दा तसेच सरकत्या जिन्यांचे रखडलेले काम यावर बैठकीत चर्चा झाली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते; मात्र अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने प्रवाशांत नाराजी आहे. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असताना प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे. डिसेंबरमधील बैठकीपासून नेमकी काय प्रगती झाली, याबाबतचा सविस्तर लेखी अहवाल सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
चौकट
सरकत्या जिन्यांचा रखडलेला प्रश्न
नेरूळ स्थानकात २०१८ पासून सरकत्या जिन्यांचे काम प्रलंबित आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. जिने नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना जड सामानासह पायऱ्या चढ-उतार कराव्या लागतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही काम सुरू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कोट
प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. प्रवाशांच्या सोयीचा खेळखंडोबा होऊ देता कामा नये.
- नामदेव भगत, माजी संचालक, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com