बांधकामांवरील कारवाई वादात
बांधकामांवरील कारवाई वादात
सिडको, पालिका अधिकाऱ्यांना गणेश नाईकांची तंबी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ ः ‘मी राज्याचा मंत्री आहे. या नात्याने बांधकामांना नोटीस पाठवण्याआधी मला विचारा,’ अशा शब्दांमध्ये गणेश नाईक यांनी सिडको, पालिका अधिकाऱ्यांना वाशीत झालेल्या जनता दरबारात सुनावले होते. त्यामुळे बांधकामांवरील कारवाई वादात सापडण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिका, सिडकोच्या बेकायदा बांधकामांविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. गावठाण भागात विनापरवानगी उभारलेली बांधकामे जमीनदोस्त केली जात आहेत. घणसोली येथे सिडकोतर्फे कारवाई सुरू असताना स्थानिकांच्या विरोधानंतर कारवाई थांबवावी लागली. याप्रकरणी गणेश नाईक यांच्या दरबारात सिडकोच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली होती. या वेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने नाईकांच्या रागाचा पारा चढला होता. नाईक यांनी थेट सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांना फोन करून सुनावले होते. काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्याऐवजी कनिष्ठ अभियंता पाठवण्यावरून विचारणा केली होती. तसेच सिडकोचे अधिकारी रिकाम्या भूखंडावर असलेली बांधकामे तोडून विकसकांच्या घशात घालण्याचे काम करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
----------------------------------------------
कामांची श्वेतपत्रिका काढणार
नवी मुंबई महापालिकेच्या तीन हजार कोटींच्या एफडी काही अधिकाऱ्यांनी तोडल्या आहेत. २,२०० कोटींचा बेसुमार खर्च केला असून हा जनतेचा पैसा आहे. नवी मुंबईकरांच्या पैशांचा दुरुपयोग करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. तसेच सर्वसाधारण सभेत या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढणार असल्याचा इशारा नाईक त्यांनी दिला.
----------------------------------------------
प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी प्रशासकीय व्यवस्थेची समांतर चाके आहेत. सिडको व नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी भ्रष्ट आहेत, अशा प्रकारचे भाष्य वारंवार करताना प्रतिबंधात्मक उपाययोजनादेखील लोकप्रतिनिधींचे संविधानिक कर्तव्य आहे.
- सुधीर दाणी, समन्वयक, सजग नागरिक मंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

