अनधिकृत इमारतींची श्वेतपत्रिका काढावी
‘ बेकायदा इमारतींची श्वेतपत्रिका काढा’
वाशी, ता.१४(बातमीदार) ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप करणाऱ्या वनमंत्री गणेश नाईकांनीच सिडकोने महापालिकेला दिलेले सतरा प्लाझा, रुग्णालयाला दिलेले भूखंड विकल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी केला आहे. तसेच सिडकोने महापालिकेला दिलेल्या भूखंडाचीस नवी मुंबईतील गाव गावठाणाच्या सभोवताली उभारलेल्या अनधिकृत इमारतींबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी झालेल्या जनता दरबार कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागवार आरोप केले होते. या आरोपाना शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी प्रतिउत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजउपयोगी ऐरोली येथील शिव स्मारक, महाराष्ट्र भवन साठी भूखंड दिल्याचे स्पष्ट केले. यावेळी विजय चौगुले यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केल्यावर नाईक यांना टीआरपी मिळतो, म्हणून नाईक आरोप करतात. पण त्यांचा बोलवता धनी हा वेगळा असल्याची टीका त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

