आंतर आयटीआय क्रिकेट स्पर्धा उत्साहात

आंतर आयटीआय क्रिकेट स्पर्धा उत्साहात
Published on

आंतरआयटीआय क्रिकेट स्पर्धा उत्साहात
आठ संघांचा सहभाग; बॉम्बे टेक्निकल स्कूल ऑफ इंजिनिअर संघ विजेता
धारावी, ता. १५ (बातमीदार) : असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट आयटीआय, महाराष्ट्र यांच्यातर्फे खासगी आयटीआय विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्यातील क्रीडा कौशल्यांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आंतरआयटीआय क्रिकेट स्पर्धा २०२६चे आयोजन करण्यात आले होते. के. जे. सोमय्या खासगी आयटीआय यांनी स्पर्धेचे यजमानपद भूषविले. सायन येथील सोमय्या क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला. उद्‌घाटन असोसिएशनचे अध्यक्ष जॉन अल्मेडा यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागतपर भाषणात त्यांनी सांगितले, की असोसिएशन विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवत असते; परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन प्रथमच करण्यात आले आहे.
सकाळी साडेआठ वाजता सर्व संघ मैदानावर शिस्तबद्ध उभे राहिले होते. रंगतदार उद्‌घाटन सोहळ्यानंतर सकाळी ९ वाजता स्पर्धेला वेळेत सुरुवात झाली. मैदानावरील व्यवस्था उत्कृष्ट असल्यामुळे सर्व सामने नियोजनानुसार आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडले. सर्व संघांनी उत्तम तयारी दर्शवत उत्कृष्ट खेळ सादर केला. त्यामुळे सामने अतिशय चुरशीचे व रोमांचक झाले.
या स्पर्धेत बॉम्बे टेक्निकल स्कूल ऑफ इंजिनिअर आयटीआयचा संघ विजेता ठरला, तर अहमद अब्दुल्ला गरिबा आयटीआयचा संघ उपविजेता ठरला. सायंकाळी ५.३० वाजता पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. सर्व पराभूत संघांना सहभाग स्मृतिचिन्ह देण्यात आले. सामनावीर पुरस्कार तसेच उत्तम फलंदाज, उत्तम गोलंदाज, उत्तम क्षेत्ररक्षक, मालिकावीर, उपविजेता व विजेता चषक प्रदान करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com