स्वावलंबी महिला योजनेला मिळणार बळ
स्वावलंबी महिला योजनेला बळ मिळणार
अस्तित्व संस्थेच्या महिलांनी घेतली महापौरांची भेट
वसई, ता. १५ (बातमीदार) : महिलांना अनुदानाची कुबडी नको तर त्यांना कायमस्वरूपी कार्यरत आणि स्वावलंबी करणारी योजना वसई-विरार शहरात सुरू करावी, अशी मागणी अस्तित्व धर्मदाय संस्थेच्या शेकडो महिलांनी महापौर अजीव पाटील यांची भेट घेऊन केली. महिलांच्या या मागणीला महापौरांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले जाते, मात्र जर त्यांना व्यवसायाचे साहित्य उपलब्ध करून दिले तर १० महिलांच्या एका लघुउद्योगाचे गट नियोजन करता येईल असा प्रस्ताव संस्थेच्या अध्यक्षा वृंदा मयेकर यांनी महापालिका प्रशासनाला सुचवला आहे. या वेळी त्यांनी संस्थेच्या असंख्य महिलांसह महापौर अजीव पाटील यांची भेट घेतली. महापालिकेने एखाद्या गटाला उद्योगासाठी रोख रक्कम न देता, त्यांना उद्योगासाठी एकदाच साधनसामग्री देण्यात यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. यातून १० महिलांचा एक गट पुढील ३० दिवसांत आपले उत्पादन लक्ष पूर्ण करून स्वतःच्या उद्योगासाठीचे भांडवल जमा करेल. या योजनेच्या पुढाकारासाठी अस्तित्व संस्था पुढाकार घेणार आहे. जर या योजनेला महापालिकेकडून हिरवा कंदील मिळाला, तर कुटुंबातील प्रत्येक महिलेला रोजगार, व्यवसायाचे साधन उपलब्ध होणार आहे.
-------
हा प्रकल्प सुरू झाल्यास एका गटातील १० कुटुंबे सक्षम होतील. त्यांना कमाईचे साधन प्राप्त होईल. आम्हाला महापौर अजीव पाटील यांनी लवकरच माहिती घेत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
- वृंदा कृपाळ मयेकर, अध्यक्षा, अस्तित्व चॅरिटेबल ट्रस्ट
--------------
महिलांच्या सक्षमीकरणासाठी बहुजन विकास आघाडी प्रयत्नशील आहे. महापालिकेच्या माध्यमातून अनेक योजना महिलांसाठी राबवल्या जात आहेत. नव्याने लघु उद्योग योजनेची मागणी करण्यात आली आहे. या योजनेबाबत अभ्यास करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- अजीव पाटील, महापौर
------------
वसई : महापौर अजीव पाटील यांना स्वावलंबी योजनेबाबत महिलांनी निवेदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

