श्री मा विद्यालयाचा थरारक विजय; ध्रुव सोनार ठरला सामनावीर

श्री मा विद्यालयाचा थरारक विजय; ध्रुव सोनार ठरला सामनावीर

Published on

श्री मा विद्यालयाचा थरारक विजय
ध्रुव सोनार ठरला सामनावीर
ठाणे, ता. १४ (बातमीदार) : श्री मा विद्यालयाने अंडर-१४ ॲडव्होकेट रमाकांत ओवलेकर ट्रॉफी स्पर्धेत रोमांचक विजय मिळवला. वसंत विहार स्कूलवर २ गडी राखत श्री मा विद्यालयाने विजय आपल्या नावावर केला. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि संयमी फलंदाजीच्या जोरावर मिळवलेला हा विजय विशेष ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वसंत विहार स्कूलने ३९.३ षटकांत १२८ धावा केल्या. मानव पोकरने ४६ धावांची झुंजार खेळी करत डाव सावरला, तर पार्थ खापणे (२१) आणि दक्ष नाईक (१६) यांनी मोलाची भर घातली. मात्र, श्री मा विद्यालयाच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना मोठी मजल मारता आली नाही. विवान मांजरेकरने ६.४ षटकांत केवळ २२ धावा देत ४ बळी घेत निर्णायक कामगिरी बजावली. अर्जुन शिरटवालेनेही अचूक माऱ्याने १८ धावांत महत्त्वाचे बळी घेत दबाव कायम ठेवला.
१२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ध्रुव सोनारने ६४ चेंडूत ४४ धावांची धाडसी खेळी साकारत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. रणवीर सिंगने २२ धावांचे योगदान देत साथ दिली. अखेरीस श्री मा विद्यालयाने २ गडी राखून लक्ष्य गाठले. सामन्यानंतर ध्रुव सोनारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला, तर श्लोक हवाले मालिकावीर आणि सर्वोत्तम यष्टीरक्षक ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com