कोलशेत गावात पाच दिवस श्री नंदिबाबा मंदिर जत्रा
कोलशेत गावात पाच दिवस श्री नंदिबाबा मंदिर जत्रा
राजस्थानमधील खाटू श्याम मंदिराचा देखावा साकारला
ठाणे शहर, ता. १५ (बातमीदार) ः कोलशेत गावातील प्रसिद्ध नंदी बाबा मंदिरात यंदा महाशिवरात्रीनिमित्त खाटू श्याम मंदिराचा आकर्षक देखावा तयार केला आहे. राजस्थानमधील खाटू गावात हे मूळ मंदिर प्रसिद्ध आहे. रविवार (ता. १५) पासून सुरु होणारी जत्रा आगामी पाच दिवस चालणार असून ढोकाळीचा परिसर शिवभक्तांनी गजबजून जाऊ लागला आहे.
कोलशेत-ढोकाळी गावाच्या रस्त्यावर १९६९ पासून सुरु झालेला श्री नंदिबाबा मंदिराचा जत्रा उत्सव अखंडपणे सुरु आहे. यंदा रविवार (ता. १५) पासून महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात होत असून गुरवार (ता.१९)पर्यंत तो सुरु राहणार आहे. या जत्रेत ठाणे, मुंबई, पालघर परिसरातील नागरिक यात्रेसाठी येत असतात. यात्रेनिमित्ताने ढोकाळी कोलशेत रोड परिसरात विविध वस्तूंची दुकाने, राहाट पाळण्यापासून इतर सर्व प्रकारचे खेळ येथे उभे करण्यात आले आहेत. मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदाही बाहेर गावातील स्टॉलधारकांसह स्थानिक गावाकऱ्यांना विविध पदार्थ-वस्तूंचे स्टॉल लावण्यास परवानगी दिली आहे. जत्रेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा हा यामागील हेतू असल्याचे नंदिबाबा मंदिर देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त साईनाथ पाटील यांनी सांगितले.
नंदिबाबा मंदिर परिसरात सचित्र देखावे
मंदिर परिसरात धर्म सक्षणासाठी देण्यात आलेला उपदेशाचे सचित्र देखावे तयार करण्यात आले आहेत. देखाव्या शेजारी लिहण्यात आलेले श्रीकृष्णाचे उपदेश धर्म रक्षणाचा संदेश देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

