मनिषा नगर मध्ये दुकानाच्या गाळ्याला आग लागून विजेची साधने जळून खाक,
मनीषानगरमध्ये दुकानाच्या गाळ्याला आग
कळवा, ता. १७ (बातमीदार) ः कळव्यातील मनीषानगरमधील एका इमारतीतील गाळ्याला आग लागल्याची घटना शनिवार (ता. १४) सायंकाळी ६.३०च्या सुमारास घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील विजेची साधने खाक झाली आहेत.
कळव्यातील मनीषानगर येथील जानकी व्हीला इमारतीमध्ये रमेश देवसीया यांचे दुकान आहे. या दुकानात शनिवारी सायंकाळी शॉकसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील इलेक्ट्रिक ओव्हन, फ्रीज, वायरिंग खाक झाले आहेत. या घटनेचे वृत्त समजताच कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, आपत्ती व्यवस्थापन समितीचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

