महानगर गॅस बिल’च्या नावाखाली निवृत्त शिक्षकाची ९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
सकाळ वृत्तसेवा

महानगर गॅस बिल’च्या नावाखाली निवृत्त शिक्षकाची ९ लाखांची ऑनलाईन फसवणूक सकाळ वृत्तसेवा

Published on

महानगर गॅस बिलच्या नावाखाली निवृत्त शिक्षकाची ९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : व्हॉट्सॲपवर महानगर गॅस बिलच्या नावाखाली निवृत्त शिक्षकाच्या बँक खात्यातून तब्बल ९ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पाचपाखाडी येथीस कृष्णा सतेकर (वय ६८) असे फसवणूक झालेल्या निवृत्त शिक्षकाचे नाव आहे. १२ जानेवारी रोजी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश आला होता. त्यासोबत महानगरगॅस बील.एपीके नावाची फाईल पाठविली होती. ती महानगर गॅसचे बिल असल्याचे समजून त्यांनी फाईल डाउनलोड करून उघडली. मात्र, त्यामध्ये कोणतीही माहिती दिसून आली नाही. यानंतर ५ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून अनुक्रमे ५ लाख रुपये आणि ४ लाख रुपये असे दोन व्यवहार झाल्याचे संदेश प्राप्त झाले. त्यांनी तत्काळ बँकेत चौकशी केली असता संबंधित रक्कम कॅनरा बँकेच्या खात्यावर ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचे उघड झाले. बँक अधिकाऱ्यांनी मोबाईलमध्ये संशयास्पद फाईल डाउनलोड केल्यामुळे मोबाईल हॅक झाल्याची शक्यता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com