बीकेसीत ‘महाभारत’ आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बीकेसीत ‘महाभारत’ आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, ता. १७ : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मैदानावर ‘महाभारत’ आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी (ता. १४) सुरू झालेले हे प्रदर्शन २३ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाला नाबार्ड यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे.
या उपक्रमाचे आयोजन आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, उद्योग मंत्रालय आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
प्रदर्शनात देशभरातील ३० स्टॉल्सना नाबार्डतर्फे विशेष सहकार्य देण्यात आले आहे. या स्टॉल्समध्ये विविध पारंपरिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक संकेत असलेली उत्पादने मांडण्यात आली आहेत. यामध्ये गाझीपूर वॉल हॅंगिंग्स, कंथा स्टिच उत्पादने, काश्मिरी पश्मीना, जोधपुरी बांधेज हस्तकला, उदयपूर हस्तकला, कोफ्तगरी धातुकाम, कोल्हापुरी चप्पल, गोरखपूर टेराकोटा, नारायणपेट हातमाग साड्या, पोचमपल्ली इकत, बनारसी साड्या, वारली चित्रकला तसेच मिर्झापूर येथील हस्तनिर्मित दऱ्या व गालिचे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

