रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे पनवेलमध्ये पुनर्वसन

रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे पनवेलमध्ये पुनर्वसन

Published on

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १५ : कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिका प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम विठ्ठलवाडी, उल्हासनगर येथून सुरू होत आहे. या कामात सुमारे २०० ते २५० घरे बाधित होत आहेत. प्रकल्पग्रस्तांना पनवेल येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या फ्लॅटमध्ये पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
रेल्वे प्रशासनाने मागील वर्षी कल्याण-बदलापूर आणि कल्याण-टिटवाळा मार्गांवर तिसरी व चौथी मार्गिका टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील बाधित घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. सुरुवातीला काही नागरिकांनी या कामाला विरोध दर्शविला होता. मात्र, शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा महापालिका गटनेते अरुण आशान आणि महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मध्यस्थीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पनवेलमधील एमएमआरडीए फ्लॅटमध्ये पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, विठ्ठलवाडी परिसरातील तीन-चार घरांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असून तेही लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

नागरिकांसोबत बैठक
रेल्वेला जागा हस्तांतरित करणे व सत्यप्रतिज्ञापत्र देण्याची प्रक्रिया काही ठिकाणी प्रलंबित होती. यासंदर्भात अरुण आशान यांनी भीम कॉलनी परिसरातील नागरिकांसोबत बैठक घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लवकरच बाधित कुटुंबांचे पुनर्वसन होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com