आरक्षित भूखंडावर अनाधिकृत बांधकामे सुरूच
टिटवाळ्यात आरक्षित भूखंडांवर माफियांचा डल्ला
कारवाईसाठी संघर्ष रहिवासी संघटना आक्रमक
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : टिटवाळा पूर्वेकडील इंदिरानगर विभागात असलेल्या महापालिकेच्या विविध आरक्षित भूखंडांवर भूमाफियांकडून सर्रास अनधिकृत बांधकामे सुरू असून, यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी संघर्ष रहिवासी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष गणेश भाटे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ पासून इंदिरानगर स्मशानभूमी रस्ता परिसरात म्युनिसिपल हाउसिंग (आरक्षण क्र. ३२), व्हेटर्नरी हॉस्पिटल (आरक्षण क्र. ३३), म्युनिसिपल क्वॉटर्स (आरक्षण क्र. ५८), पार्किंग (आरक्षण क्र. ५९) आणि अमुझमेंट पार्क (आरक्षण क्र. ६०) या महत्त्वाच्या आरक्षणांवर अनधिकृत घरांचे बांधकाम सातत्याने सुरू आहे. या बांधकामांना स्थानिक राजकीय नेते आणि महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचे अभय असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे केवळ बांधकामे पाडून न थांबता, या अनधिकृत कृत्यास साथ देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी गणेश भाटे यांनी केली आहे. अन्यथा, आरक्षित भूखंडांवरील हे अतिक्रमण भविष्यात शहराच्या नियोजित विकासासाठी अडथळा ठरेल, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

