जागतिक व्यासपीठावर डोंबिवलीचा ठसा

जागतिक व्यासपीठावर डोंबिवलीचा ठसा

Published on

जागतिक व्यासपीठावर डोंबिवलीचा ठसा
मधुमेह नियंत्रणावर डॉ. महेश पाटील यांचे मार्गदर्शन

डोंबिवली, ता. १७ ः प्रसिद्ध आयुर्वेदिक मधुमेहतज्ज्ञ आणि डायबेटीस रिव्हर्सल कोच डॉ. महेश पाटील यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत आपले संशोधन सादर करून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हैदराबाद येथे १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या मधुमेह व लठ्ठपणाविषयक जागतिक परिषदेत त्यांनी जीवनशैलीवर आधारित मधुमेह नियंत्रणाबाबत महत्त्वपूर्ण निष्कर्ष मांडले.

‘डायबिटीज ३६०°: विज्ञानातील शाश्वतता’ या मुख्य संकल्पनेवर आधारित या परिषदेत डॉ. पाटील यांनी संतुलित आहार, नियोजित उपवास, नियमित व्यायाम आणि ताणतणाव व्यवस्थापन यांच्या साहाय्याने HbA1cमध्ये मोठी घट कशी साध्य करता येते, हे सप्रमाण सिद्ध केले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधांवरील अवलंबित्व कमी करून मधुमेह नियंत्रण शक्य असल्याचे त्यांनी या वेळी अधोरेखित केले. या प्रतिष्ठित परिषदेत डॉ. व्ही. मोहन, डॉ. अनुप मिश्रा, डॉ. शशांक जोशी यांसारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनसह जागतिक आरोग्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेषतः भारतीय रुग्णांच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास करून डॉ. पाटील यांनी तयार केलेल्या आराखड्याचे उपस्थित तज्ज्ञांनी कौतुक केले. मधुमेह व्यवस्थापनात रुग्णाचे स्वतःचे सक्षमीकरण ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. पाटील यांनी मिळवलेले हे यश डोंबिवलीकरांसाठी अभिमानास्पद मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com