वाळू तस्करांचा धुमाकूळ

वाळू तस्करांचा धुमाकूळ
Published on

वाळू तस्करांचा धुमाकूळ
डहाणू किनारपट्टी लक्ष्य, प्रशासनाचे दुर्लक्ष
कासा, ता. १६ (बातमीदार)ः डहाणूला निसर्गसंपन्न असा समुद्रकिनारा लाभला आहे, पण सध्या वाळू चोरांमुळे किनारा खचत चालला आहे. या समुद्रकिनारा परिसरापासून नरपड, चिखले ते घोलवड किनारपट्टीपर्यंत वाळू तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील अनधिकृत उत्खननामुळे किनाऱ्यालगतच्या वस्त्या तसेच डहाणू उपजिल्हा रुग्णालय धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. महसूल तसेच पोलिस विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. डहाणू समुद्रकिनाऱ्यावर बैलगाडी, वाहनांच्या मदतीने वाळू उपसा केला जात असून, भरतीचे पाणी थेट किनाऱ्यालगतच्या भागात शिरण्याचा धोका वाढला आहे. तसेच किनाऱ्यावरील झाडे कोसळत असून, बागायती, शेतजमिनींमध्ये समुद्राचे पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासंदर्भात तहसीलदार सुनील कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
-----------------------
भरतीचे पाणी थेट गावात
किनारे ढासळत चालले असून, अनेक वर्षांची सुरुची झाडे जमीनदोस्त आहेत. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असतानाही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. भविष्यात भरतीचे पाणी थेट गावांमध्ये शिरण्याची भीती आहे.
------------------------
कठोर कारवाईचा अभाव
काही प्रामाणिक सर्कल, तलाठी अधिकारी कारवाई करण्याचा प्रयत्न करीत असले, तरी महसूल यंत्रणेमार्फत वाळू तस्करांवर सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात. त्यामुळे प्रशासनाने किनारपट्टीच्या संरक्षणासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com