अलिबागमध्ये शासकीय योजनांचा महामेळावा
अलिबागमध्ये शासकीय योजनांचा महामेळावा
लाभार्थ्यांना थेट धनादेशचे वाटप
अलिबाग, ता. १६ (बातमीदार) : सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कुरूळ येथील आरसीएफ हॉलमध्ये विधी सेवा शिबिर व विविध शासकीय योजनांचा महामेळावा पार पडला. जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विविध विभागांचे ३२ स्टॉल्स उभारून नागरिकांना योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागीच स्वीकारण्यात आले व निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वाटप करण्यात आले.
या वेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे, सरकारी वकील ॲड. संतोष पवार, अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
चौकट
गरजूंपर्यंत पोहोचण्यास मदत
योजनांची केवळ माहिती न देता अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी आणि थेट लाभ वाटप एकाच ठिकाणी केल्याने नागरिकांच्या शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या वाचल्या आणि योजना प्रत्यक्ष गरजूंंपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत झाली. जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी मार्गदर्शन करताना अशा शिबिरांचे वारंवार आयोजन करण्याचे आवाहन केले. तसेच विविध योजनांची माहितीही थोडक्यात सांगितली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

