खासगी वाहनांकडून वाहतुकीत अडथळा

खासगी वाहनांकडून वाहतुकीत अडथळा

Published on

बेलापूर, ता. १६ (बातमीदार) : सायन-पनवेल महामार्ग विविध अडचणींसाठी परिचित आहे. तुर्भे नाका, उरण फाटा, बेलापूर फाटा या ठिकाणी कोंडीची समस्या कायम आहे. अशातच या मार्गावर असणाऱ्या जुईनगर स्थानकाबाहेरील स्टँडवर बाहेरगावी जाणाऱ्या खासगी वाहनांकडून स्टँडऐवजी चक्क रस्त्यात बस थांबवण्यात येत असल्याने महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. परिणामी या ठिकाणी लहान-मोठ्या अपघाताच्या घटनादेखील घडत आहेत. वाहतूक पोलिसांनी खासगी बस, एसटी बसचे मार्गावरील नियमन करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

वाशी, जुईनगर, नेरूळ एलपी, बेलापूर फाटा या ठिकाणाहून मुंबई, नवी मुंबईहून बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्या खासगी, एसटी बसची कायम वर्दळ असते. यासाठी स्टँडदेखील उपलब्ध आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे या वाहनचालकांकडून राजरोसपणे रस्त्यात गाड्या थांबवणे, अचानक लेन बदलून बस स्टँडवर उभ्या करणे अशा घटना दिवसेंदिवस वाढीस लागल्या आहेत. यामुळे महामार्गावर अन्य वाहनांना अडथळा होत असून, अपघाताची शक्यतादेखील नाकारता येत नाही. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसचालकांवर दंडात्मक कारवाईसोबत वाहतूक शिस्तीचे धडे द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सायन-पनवेल महामार्गाची दुर्दशा झाली आहे. तुर्भे नाका येथील विविध कामांमुळे अपघातात वाढ झाली आहे. जुईनगर स्टँडवरदेखील खासगी बसचालकांचा बेशिस्तपणा वारंवार दिसून येत असून, वाहतूक पोलिसांचा कोणताही वचक राहिलेला नाही.
- विनय मोरे, सारथी सुरक्षा सेवा संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com