नागझरी, पेठ येथे जलअर्पण सोहळा
नागझरी, पेठ येथे जल अर्पण सोहळा
‘जलजीवन मिशन’अंतर्गत पाणी शुद्धीकरणाची प्रात्यक्षिके
पालघर, ता. १६ (बातमीदार)ः ग्रामीण भागातील कुटुंबांना शुद्ध, पुरेसे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी ‘जलजीवन मिशन’अंतर्गत प्रत्येक गावाला हस्तांतरण दिवस जल अर्पण दिवस साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नागझरी, पेठ येथे विविध उपक्रम राबवण्यात आले.
जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध, पुरेसा पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. गावातील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेल्या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात येत आहेत. त्यानुसार नागझरी, पेठ गावातील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सुरूम यांच्या मार्गदर्शनात जल अर्पण दिवस गावात साजरा करण्यात आला. या वेळी गावातील पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना देऊन योजना कायमस्वरूपी ठेवण्यासाठी देखभाल दुरुस्तीची हमी घेण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांची गावातून रॅली, जल प्रतिज्ञा, गावातून विद्यार्थी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांची प्रभातफेरी काढण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

