महामेळाव्यात महावितरणच्या दालनास वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महामेळाव्यात महावितरणच्या दालनास वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Published on

महामेळाव्यात महावितरणच्या दालनास वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिबाग, ता. १६ ( वार्ताहर ) : अलिबाग येथे आयोजित जिल्हा विधी सेवा महाशिबिर व विविध शासकीय योजनांच्या महामेळाव्यात महावितरणच्या पेण मंडळाने उभारलेल्या माहिती दालनाला वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी किशन जावळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी दालनाला भेट देऊन योजनांची सविस्तर माहिती घेतली.
महावितरणतर्फे पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजना, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना तसेच टीओडी मीटरचे फायदे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या योजनांचा लाभ घेतलेल्या सुप्रिया पाटील व प्रवीण पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुमारे २५० नागरिकांनी दालनाला भेट देत वीज बचत व सौरऊर्जेच्या योजनांबाबत माहिती घेतली.
यावेळी पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता उमेश चव्हाण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आकाश तायडे, सहाय्यक अभियंता महेश पाटील यांच्यासह महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com