हरिहरेश्वर येथे महाशिवरात्री उत्सव साजरा.
हरिहरेश्वरमध्ये शिव-पार्वती पालखी सोहळा
महाशिवरात्रीनिमित्त विशेष यात्रेचे आयोजन
श्रीवर्धन, ता. १६ (वार्ताहर) ः दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरमध्ये महाशिवरात्रनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेचे आणि धार्मिक सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कोविड काळानंतर मंदिराचे विश्वस्त निनाद गुरव यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष पालखी सोहळ्याने यंदाही भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
हरिहरेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्ताने महादेव आणि पार्वती देवीच्या पालखीचे तीन दिवसांचे आयोजन करण्यात आले. ही पालखी रात्री गाव प्रदक्षिणा करते. यामुळे हरोबा आमच्या दारी भेटीला येतो, अशी श्रद्धा ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे. या पालखी दरम्यान सर्वच ग्रामस्थ आणि इतर भाविक या सोहळ्याकरिता उपस्थित राहतात.
या पालखी उत्सवाचा प्रारंभ झाल्यापासून महाप्रसादाचे नियोजन संस्थेचे सचिव खजिनदार सिद्धेश पोवार यांचे संकल्पनेतून सुरू करण्यात आले आहे. या तीन दिवस चालणाऱ्या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम संस्थेचे वतीने आयोजित करण्यात येतात, मंदिराला फुलांची आरास व सजावट पोलिस अधिकारी आणि भाविक करतात. या उत्सवाची सांगता महाप्रसाद व लळीताचे कीर्तनाने होते. या उत्सवाला अनेक भाविकांनी हरिहरेश्वर येथे हजेरी लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

