महाशिवरात्रीला भव्य साधना सोहळा
महाशिवरात्रीला भव्य साधना सोहळा
१,००० हून अधिक भक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती
स्वामी उपेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान-यज्ञ संपन्न
नवी मुंबई, ता. १६ : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त अंतर योग फाउंडेशनतर्फे ठाण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली मोफत जीवन परिवर्तनकारी विशेष साधना भक्तिभावात पार पडली. फाउंडेशनचे संस्थापक ब्रह्मर्षी आचार्य स्वामी उपेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यास ठाणे, नवी मुंबई व मुंबई परिसरातील हजाराहून अधिक साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळी सात वाजता प्रारंभ झालेल्या साधना शिबिरात ध्यान, जप, प्रार्थना, ऊर्जाधारित साधना यांसह आरोग्य, समृद्धी, सुदृढ नातेसंबंध आणि शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमादरम्यान महामृत्युंजय यज्ञ, शिवलिंग अभिषेक आणि इच्छापूर्तीसाठी संकल्प विधी संपन्न झाले. उपस्थितांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य सल्ला तसेच साधनेपूर्वी व नंतर वैद्यकीय तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगती व एकाग्रता वाढविण्यासाठी स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात आले होते. साधकांनी मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याची भावना व्यक्त केली. योग्य साधनेतून त्वरित फलश्रुती मिळते, यालाच खरे अध्यात्म म्हणतात, असे प्रतिपादन स्वामी उपेंद्र महाराज यांनी केले. देशभरातील तीन कोटी लोकांपर्यंत ही साधना पोहोचविण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. ठाण्यातील सकाळच्या सत्रानंतर मुंबईत झालेल्या सत्रालाही मोठी उपस्थिती लाभली.
महत्त्वाचा मुद्दा : ‘सायन्स ऑफ हीलिंग’ संकल्पनेची मांडणी
पारंपरिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधणारी ‘सायन्स ऑफ हीलिंग’ ही संकल्पना विविध राष्ट्रीय संस्थांकडे सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या माध्यमातून सामाजिक आरोग्य आणि मानसिक संतुलन वृद्धिंगत करण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

