पनवेल रेल्वे स्थानकाजवळ गांजा विक्रीचा प्रयत्न
पनवेल, ता. १६ (वार्ताहर) : रेल्वे स्थानक परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. सागर रवी जोसेफ (वय २९) आणि गणेश रवी जोसेफ (२१) यांच्याकडून पोलिसांनी सुमारे चार किलो ६९६ ग्रॅम गांजा आणि इतर मुद्देमाल असा एकूण एक लाख दहा रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पनवेल रेल्वे स्थानकासमोरील भारत चाळ परिसरात काही तरुण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी रविवारी (ता. १५) मध्यरात्री येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास साईबाबा मंदिर परिसरात सापळा लावला होता. या वेळी त्याठिकाणी सागर आणि गणेश हे संशयास्पदरित्या वावरताना आढळून आल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोघांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ गांजा, तसेच फोन व रोख रक्कम असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडे सापडलेला गांजा व प्लॅस्टिकच्या पिशव्या, चिलिम ओढण्याचे साहित्य जप्त करून दोघांना अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

