सागरी महामार्गासाठी निधीची तरतूद

सागरी महामार्गासाठी निधीची तरतूद

Published on

सागरी महामार्गासाठी निधीची तरतूद
पालघर ः जिल्ह्यातील सागरी राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांतर्गत तब्बल १६५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. याअंतर्गत पालघर पाणेरी येथील कामाचे भूमिपूजन आमदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. डहाणू तालुक्यातील पारनाका ते पालघर तालुक्यातील पारगावपर्यंतचा रस्ता झाल्याने दळणवळण सुलभ होणार आहे. तसेच वडराई येथे धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजनही या वेळी करण्यात आले. या बंधाऱ्यासाठी आठ कोटींच्या निधीसाठी आमदार गावीत यांनी प्रयत्न केले होते. या कामामुळे किनाऱ्याची धूप थांबणार आहे. दोन्ही कामांच्या भूमिपूजनावेळी माहीम सरपंच, सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com