मुंबई
ओंदे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन
ओंदे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन
विक्रमगड (बातमीदार) ः ओंदे येथील व्ही. जी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील होते. या वेळी संस्थेचे सचिव राजू पाटील, कार्याध्यक्ष डॉ. सुधाकर पाटील, खजिनदार शहाजी गोळे, संचालिका दर्शना पाटील, शीतल पाटील, हरिश्चंद्र पाटील तसेच ठाणे येथील उद्योजक प्रणीत पाटील उपस्थित होते.

