क्षयरोग मुक्त पालघर जिल्ह्याचा निर्धार

क्षयरोग मुक्त पालघर जिल्ह्याचा निर्धार

Published on

पालघर, ता. १७ ः पालघर जिल्ह्यातील क्षयरोग निर्मूलन व्हावे, या दृष्टीने आरोग्य यंत्रणेमार्फत प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सामाजिक जबाबदारी म्हणून समाजाने क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी केले आहे.
पालघर जिल्ह्यात २,६५३ क्षयरुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैकी ८५० रुग्णांना आजपर्यंत ३,५८४ प्रथिनयुक्त अन्नधान्य टोपल्यांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात अभियान सुरू झाल्यापासून ६,९४५ टोपल्यांचे वितरण करण्यात आले असून, २०२५ मध्येच ३,५८४ टोपल्या देण्यात आल्या आहेत. या उपक्रमात विविध सामाजिक संस्था तसेच कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत विविध कंपन्यांनी सक्रिय सहभाग असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले. या वेळी सामाजिक जबाबदारी म्हणून निक्षय मित्र बनण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच १० रुग्णांना प्रथिनयुक्त अन्नधान्य टोपल्यांचे वाटप केले. तसेच बी-पाल्म उपचार पूर्ण करून क्षयमुक्त झालेल्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, सर्व वैद्यकीय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), अन्न व औषध प्रशासन अधिकारी, वेदांत वैद्यकीय महाविद्यालयाचे श्वसनरोग विभागप्रमुख डॉ. घोरपडे (दृकश्राव्य माध्यमाद्वारे), तसेच सर्व गटविकास अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------------------
काय आहे निक्षय मित्र
- क्षयरुग्णांना औषधोपचारासोबत प्रथिनयुक्त आहाराचीही गरज असते. शासनाकडून रुग्णांना दरमहा १,००० रुपये पोषण सहाय्य दिले जाते. याशिवाय समाजातील दानशूर व्यक्ती, अधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्था, उद्योगसमूह निक्षय मित्र बनून मदत करू शकतात.
- क्षयरोग निर्मूलनाच्या संबंधित असलेली क्ष-किरण तपासणी, न्युक्लिक ॲसिड प्रवर्धन चाचणी (एनएएटी), बहुऔषध प्रतिरोधक (एमडीआर) रुग्णांचे प्रमाण, उपचार स्थिती, औषधसाठा व उपलब्धता आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com