

धारावीत संत कक्कया महाराजांची जयंती उत्सहात
धारावी, ता. १७ (बातमीदार) : १२ व्या शतकातील महात्मा बसवेश्वर महाराज यांचे पटशिष्य, थोर समाजसुधारक, संत, क्रांतिकारी योद्धा, शरणश्रेष्ठ, महाप्रसादी व लिंगायत धर्म वचन साहित्याचे रक्षक वीरशरण श्री संत कक्कय्या महाराज यांची ९२१ वी जयंती धारावीत रविवारी (ता. १५) उत्साहात साजरी करण्यात आली. धारावीत कक्कया (ढोर) समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात गेली १०० वर्षांहून अधिक काळापासून वास्तव्यास आहेत. चामड्याची वस्तू बनवणे हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.
धारावीत अनेक ठिकाणी संत कक्कया महाराजांची जयंती साजरी केली गेली. येथील कल्याण वाडीमध्ये भारतभूमी क्रीडा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री कक्कया महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेली २२ वर्षे हे मंडळ पालखी सोहळ्याचे आयोजन धारावीत मान्यवरांच्या मार्गदर्शन व सहकार्याने करत असल्याची माहिती मंडळाचे सदस्य विजय शिंदे यांनी दिली. वामन पोळ, किशोर धडके, हेमंत व्हटकर आदी मंडळाचे कार्यकर्ते पालखी सोहळ्याच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतात.
------------
विविध कार्यक्रमांचे आयोजन
पालखीची सुरुवात कल्याणवाडी येथील रंग कारखाना येथून करण्यात आली. धारावी मुख्य रस्ता, धारावी कोळीवाडा, काळा किल्ला, संत रोहिदास मार्ग अशी पालखी फिरून संत कक्कया मार्गावरील एन. शिवराज मैदान येथे तिची सांगता करण्यात आली. या वेळी मोफत आरोग्य शिबिर व महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालखीमध्ये धारावी, मुंबई तसेच ठाणे व पालघर जिल्हा आदी ठिकाणाहून कक्कया समाजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी मार्गावर अनेक मंडळांनी थंड पेय, पाणी आदींचे वाटप केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.