ठाण्यात एसआरपीएफ जवानाचा महागडा मोबाईल चोरला

ठाण्यात एसआरपीएफ जवानाचा महागडा मोबाईल चोरला

Published on

एसआरपीएफ जवानाचा महागडा मोबाईल चोरला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाणे रेल्वे स्थानकावर एका एसआरपीएफ जवानाचा महागडा मोबाईल चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. ८२ हजार मोबाईलची किंमत असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मूळ कोल्हापूर येथील साजन खोत (वय २७) हे सध्या एसआरपीएफ गट क्रमांक ४ येथे नोकरीस आहेत. ते घणसोली येथे बहिणीकडे वास्तव्यास असून रविवारी (ता. १५) भायखळा येथे जाण्यासाठी त्यांनी घणसोली ते ठाणे असा लोकल प्रवास केला. ठाणे रेल्वे स्थानकात सीएसएमटी फास्ट लोकलच्या चढल्यानंतर त्यांनी खिशात मोबाईल तपासला असता तो गायब असल्याचे लक्षात आले. शोध घेतला असता मोबाईल मिळून आला नाही. त्यांचा ८२ हजार रुपये किंमतीचा आयफोन-१७ हा मोबाईल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास लोहमार्ग पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com