नवी मुंबईत शिवजन्मोत्सवाची जल्लोषात तयारी

नवी मुंबईत शिवजन्मोत्सवाची जल्लोषात तयारी

Published on

नवी मुंबईत शिवजन्मोत्सवाची जल्लोषात तयारी
कोपरखैरणे व वाशी येथे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
तुर्भे, ता. १८ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. कोपरखैरणे येथे डीएम प्रतिष्ठान आणि युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपेश सुहास म्हात्रे यांच्या पुढाकारातून प्रथमच हा सोहळा साजरा होत आहे. दियोदिनी बंगलो, सेक्टर १९ सी येथे गुरुवारी सकाळी ९ वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून भजन, दर्शन, सायंकाळी हभप अमित महाराज म्हात्रे यांचे शिवचरित्र व्याख्यान आणि रात्री शिवभोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, वाशी येथे सकल मराठा समाज व शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने पोवाडा, ढोल-ताशावादन, महिला लेझीम, भजनी मंडळ, लेझर लाइट शो तसेच शिवरायांचा पाळणा या आकर्षक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रायगडभूषण वैभव घरत यांचा पोवाडा हे विशेष आकर्षण ठरणार आहे.


शिवरायांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यावर भर
या सोहळ्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि संस्कारमूल्ये तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आयोजकांचा संकल्प आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक सादरीकरणातून इतिहासाची ओळख करून देत समाजात एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे. शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com