स्वीकृत नगरसेवकपदावरून भाजपमध्ये खदखद

स्वीकृत नगरसेवकपदावरून भाजपमध्ये खदखद

Published on

स्वीकृत नगरसेवकपदावरून भाजपमध्ये खदखद
विशाल डोळस यांना डावलल्याची चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांवरून भारतीय जनता पक्षात अंतर्गत चर्चांना उधाण आले असून, सिवूड्सचे माजी नगरसेवक विशाल डोळस यांना संधी नाकारण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. दिघा व तुर्भे परिसरातील पराभूत झालेल्या काही माजी नगरसेवकांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात आल्याची चर्चा असताना डोळस यांच्या नावाचा विचारच न झाल्याने समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक पातळीवर आक्रमक आणि सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून डोळस यांची ओळख आहे. नवी मुंबईत पहिली सीबीएसई शाळा सुरू करण्याची मागणी, पायाभूत सुविधांचे प्रश्न, तसेच नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांनी वारंवार आंदोलने केली होती. काही आंदोलने पक्षाची पूर्वपरवानगी न घेता केल्याची चर्चा असून, त्यांच्या ‘अति सक्रिय’ भूमिकेमुळेच पक्षश्रेष्ठींनी त्यांना दूर ठेवले का, असा सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.

चौकट
सक्रिय नेतृत्व की पक्षांतर्गत राजकारण?
डोळस यांच्या नावाचा विचार न होणे हा केवळ संघटनात्मक निर्णय की पक्षांतर्गत समीकरणांचा परिणाम, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्याला डावलल्याची भावना समर्थकांमध्ये निर्माण झाली असून, याचा स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात पक्षश्रेष्ठी या नाराजीवर कसा तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com