मोहोपाडा येथे ‘दिव्यांग मैत्री चषक २०२६’

मोहोपाडा येथे ‘दिव्यांग मैत्री चषक २०२६’

Published on

मोहोपाडा येथे ‘दिव्यांग मैत्री चषक २०२६’
तळा, ता. १७ (बातमीदार) : रायगड, मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील दिव्यांग खेळाडूंना एकत्र आणणारा ‘दिव्यांग मैत्री चषक २०२६’ हा लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा सोहळा शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी मोहोपाडा (ता. खालापूर) येथील एनआयएसएम ग्राउंडवर रंगणार आहे. कुलाबा दिव्यांग सोशल फाउंडेशन इंडिया व कुलाबा दिव्यांग क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मैत्री चषकात चार संघ सहभागी होणार असून, दिव्यांग खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढवणे, क्रीडास्पर्धांद्वारे सामाजिक एकात्मता दृढ करणे आणि दिव्यांग क्रिकेटला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष शशांक हिरवे, कार्याध्यक्ष व सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील, सचिव सुनील पाटील, खजिनदार अरुण घोडके यांच्यासह कल्पेश तवले, मंगेश पार्टे, नागनाथ घोडके, रुपेश पवार, रवी भोईर, यशवंत शिंदे, रमाकांत मांडे आणि स्वामीज फाउंडेशन इंडिया यांच्या सहकार्याने करण्यात आले असल्याची माहिती शिवाजी पाटील यांनी दिली.
या स्पर्धेला क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com