श्री दत्त देवस्थानतर्फे भाविकांना रुद्राक्षांची अनोखी भेट

श्री दत्त देवस्थानतर्फे भाविकांना रुद्राक्षांची अनोखी भेट

Published on

श्री दत्त देवस्थानतर्फे भाविकांना रुद्राक्षांची अनोखी भेट
मुरूड, ता. १७ (बातमीदार) : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुरूड-जंजिरा शहरातील उंच टेकडीवरील श्री दत्त मंदिर देवस्थान येथे आयोजित २४व्या लघुरुद्र व दत्तयाग सोहळ्यात भाविकांना रुद्राक्ष प्रसादाची अनोखी भेट देण्यात आली. सुमारे ३०० वर्षांपूर्वी स्वामी ब्रम्हेन्द्र महाराज यांनी येथे श्रीदत्त पादुकांची स्थापना केली असून, हे स्थान आध्यात्मिक शक्तीचे केंद्र मानले जाते.
या वेळी भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज सावर्डेकर यांनी प्रवचनात श्रीदत्त भक्तीचे महत्त्व सांगत टेंबे स्वामी लिखित दत्त माहात्म्य ग्रंथातील कथा उपस्थितांना श्रवण करून दिली. आगमोक्त मंत्रोच्चारात बिल्वपत्र अर्पण करून दत्तमूर्तीची पूजा करण्यात आली.
बेलपत्र पूजनानंतर सुमारे ५०० भाविकांना गाणगापूर येथील निर्गुण पादुकांवर विलेपित अत्तरयुक्त चंदन, कुरवपूर येथील दत्तयागातील भस्म तसेच उज्जैन येथे सिद्ध केलेले रुद्राक्ष प्रसादरूपाने देण्यात आले.
कार्यक्रमाला देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद भायदे, उपाध्यक्ष वसंत पाटील, सचिव आदेश दांडेकर, खजिनदार कृष्णा आरेकर यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली असून, भाविकांना नारळीपाकाचा महाप्रसाद देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com