प्रत्येक दारापर्यंत आरोग्यसेवा
प्रत्येक दारापर्यंत आरोग्यसेवा
दीपक फर्टिलायझर्सच्या उपक्रमातून ४२ गावांतील नागरिकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : तळोजा परिसरातील नागरिकांना परवडणारी आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी, यासाठी दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडने सीएसआर उपक्रमांतर्गत ईशान्य फाउंडेशनच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दोन मोबाईल मेडिकल युनिट्सद्वारे ४२ गावांमध्ये थेट तपासणी, औषधे व तज्ज्ञांचा सल्ला दिला जात असून, चालू वर्षात २२,६५१ नागरिकांनी लाभ घेतला. देवीचा पाडा येथे सवलतीच्या दरात पॅथॉलॉजी सेवा सुरू करण्यात आली असून, आनंद हॉस्पिटल तळोजाच्या सहकार्याने एक्स-रे, अल्ट्रासाउंड व डायलिसिस सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तसेच आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्रतपासणी शिबिरांत १,१५४ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
चौकट
लवकर निदान ठरते जीवनरक्षक
ग्रामीण भागात खर्च व अंतरामुळे तपासण्या टाळल्या जातात. गावातच उपलब्ध झालेल्या सवलतीच्या तपासण्यांमुळे मधुमेह, रक्तदाब व किडनीसारख्या आजारांचे प्रारंभीच निदान होत असून, वेळेत उपचार शक्य होत आहेत. त्यामुळे नागरिकांचा खर्च वाचत असून, आरोग्याचा धोका कमी झाला आहे.
कोट
ग्रामीण भागात सशक्त समुदाय घडवण्यासाठी आरोग्यसेवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तळोजा परिसरातील आपल्या सातत्यपूर्ण कामाद्वारे दीपक फर्टिलायझर्स सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या, सुलभ आणि परवडणाऱ्या उपाययोजना राबवत आहे. तळोजा परिसरातील आरोग्यसेवेतील प्रत्यक्ष गरजा ओळखून मोबाईल क्लिनिक, डायग्नोस्टिक्स किंवा नेत्रतपासणी असो समुदायाला वेळेवर आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हाच आमचा प्रयत्न आहे. दीपक फर्टिलायझर्सच्या सातत्यपूर्ण सीएसआर प्रयत्नांमुळे तळोजा परिसरातील ग्रामीण भागात आरोग्यसेवा अधिक सक्षम, उपलब्ध आणि लोकाभिमुख होत आहे.
- नरेशकुमार पिनिसेट्टी, अध्यक्ष - कॉर्पोरेट गव्हर्नन्स, दीपक फर्टिलायझर्स

