मुलुंडमध्ये ‘पक्षी आहार’ मोहीम

मुलुंडमध्ये ‘पक्षी आहार’ मोहीम

Published on

मुलुंडमध्ये ‘पक्षी आहार’ मोहीम, उद्याने, मैदानात पाण्याची व्यवस्था

मुलुंड, ता. १७ (बातमीदार) : सध्या राज्यातील तापमान वाढले असून, मानवासह, प्राणी, पशु-पक्ष्यांनाही उष्माघाताचा त्रास होत आहे. हीच बाब ओळखून मुलुंडमधील समाजसेवक शुलभ जैन यांनी पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पक्षी आहार मोहीम सुरू केली आहे.
शुलभ जैन म्हणाले की, मुलुंडमध्ये कडक उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हामुळे पक्षी आणि प्राणी पाण्याविना तडफडत आहेत. अशा पक्ष्यांना उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी मी आणि माझे सहकारी नलिन शाह यांनी पाण्यावाचून एकही पक्षी किंवा प्राणी मरणार नाही, या उद्देशाने ‘सोच बदलो मुलुंड बदलेगा’ ही मोहीम सुरू केली आहे. मुलुंडमध्ये शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंडच्या उद्यानात व मैदानात तसेच विविध भागातील झाडाझुडपांमध्ये पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याची भांडी बसविण्यात येत आहेत. मुलुंडमधील नागरिकांना मोफत कुंड्यांचे वाटप करण्यात येत आहे. हे भांडे कोणाला हवे असल्यास आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

-----------
पक्षीमित्रांचा पुढाकार
कडक उन्हाच्या दिवसात पशु-पक्ष्यांच्या बचावासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘स्पॅरोज शेल्टर’ या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांनी महिनाभरात जवळपास उष्माघाताने आजारी १५० ते २०० पक्ष्यांवर उपचार केल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली. ही संस्था गेली १५ वर्षे पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी इमारतीच्या गच्चीवर मुबलक पाण्याची सोय करावी, तसेच उष्माघाताचा त्रास झालेला पक्षी आढळल्यास स्पॅरोज शेल्टरशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com