दैनंदिन बाजार सुरू तरी सानपाड्यात फेरीवाले ‘जैसे थे’

दैनंदिन बाजार सुरू तरी सानपाड्यात फेरीवाले ‘जैसे थे’

Published on

दैनंदिन बाजार सुरू तरी सानपाड्यात फेरीवाले जैसे थे
पदपथ मोकळे करण्यासाठी रेलिंग; स्टेशन परिसरात वाढली वाहतूक कोंडी
नेरूळ, ता. १७ (बातमीदार) : सानपाडा सेक्टर ४ येथे नवी मुंबई महापालिकेने दैनंदिन बाजार सुरू करून नोंदणीकृत फेरीवाल्यांना ओटे वाटप केले असले तरी सेक्टर-३ परिसरातील पदपथावरील अनधिकृत व्यवसाय कमी झालेला नाही. पदपथ मोकळे करण्यासाठी रेलिंग बसविण्यात आले असूनही काही फेरीवाले त्याच ठिकाणी व्यवसाय करीत आहेत, तर अनेकांनी रेल्वे स्थानकाजवळील पार्किंग व स्टेशनसमोरील जागा व्यापली आहे. त्यामुळे नागरिकांना पायी चालणे अवघड होत असून, वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.
महापालिकेने टपऱ्यांवर कारवाई करून पदपथ मोकळा करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र फेरीवाल्यांचे स्थलांतर पूर्णपणे झालेले नाही. दैनंदिन बाजारात सुविधा उपलब्ध असूनही काही जण पदपथावरच व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे.
चौकट
अंमलबजावणीचा अभाव ठरतोय मुख्य अडथळा
दैनंदिन बाजार उभारण्यामागचा उद्देश फेरीवाल्यांना नियोजित जागा देऊन पदपथ मोकळे करणे हा होता. मात्र सातत्यपूर्ण कारवाई आणि नियंत्रणाचा अभाव असल्याने फेरीवाले पुन्हा जुन्याच ठिकाणी व्यवसाय करू लागले आहेत. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडी, पार्किंगची अडचण आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, बाजाराची संकल्पना अपुरी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com