आरोग्य शिबिरांचा १३०२ नागरिकांनी घेतला लाभ

आरोग्य शिबिरांचा १३०२ नागरिकांनी घेतला लाभ

Published on

आरोग्य शिबिरांचा १,३०२ नागरिकांना लाभ
महिला, बालकांसह ज्येष्ठांची तपासणी
वाशी, ता. १७ (बातमीदार) : हिंद दी चादर उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, १६ फेब्रुवारीला झालेल्या शिबिरांचा १,३०२ जणांनी लाभ घेतला. १० फेब्रुवारीपासून आतापर्यंत ४२ शिबिरांमधून सहा हजार ४३४ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली तसेच माता-बाल रुग्णालय, तुर्भे यांसह नेरूळ सेक्टर ४८, कातकरी पाडा, चिंचपाडा, ऐरोली, पावणे आणि नोसिल नाका परिसरात ही शिबिरे झाली. उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा व स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, क्षयरोग तपासणी, सिकलसेल निदान तसेच माता-बाल आरोग्य व लसीकरण सेवा देण्यात आल्या.
चौकट
प्रतिबंधात्मक तपासण्यांवर भर
या शिबिरांमधून आजारांचे लवकर निदान करण्यावर विशेष भर देण्यात आला. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांची सुरुवातीच्या टप्प्यात तपासणी झाल्याने पुढील उपचार वेळेत सुरू करणे शक्य होत आहे. विशेषतः महिलांची क्षयरोग व कर्करोग तपासणी मोठ्या प्रमाणात झाल्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळ मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com