‘अ’ प्रभागातील अनधिकृत चाळींचा सुळसुळाट;

‘अ’ प्रभागातील अनधिकृत चाळींचा सुळसुळाट;

Published on

अनधिकृत चाळींचा सुळसुळाट
‘अ’ प्रभागातील आयुक्तांनी पाहणी करावी, नागरिकांची मागणी
टिटवाळा, ता. १७ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग ‘अ’ अंतर्गत येणाऱ्या बल्याणी, उंबरणी, मोहिली, मांडा, टिटवाळा आणि इंदिरानगर परिसरात अनधिकृत बांधकामांनी वेढा घातला आहे. विशेष म्हणजे रुग्णालयांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवरही अतिक्रमणे झाली असून, महापालिका आयुक्तांना तक्रार देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
अख्तर फैय्याज ईराणी आणि ॲड. रमजान मेहबुब शेख या तक्रारदारांनी पालिकेला निवेदन दिले आहे. यानुसार काही ठिकाणी १५ ते २० खोल्यांचे बांधकाम पूर्णत्वास गेले असून, काही ठिकाणी नव्याने विटांचे बांधकाम, पत्र्यांच्या शेड्स, सिमेंट काँक्रीटची कामे वेगाने सुरू आहेत. संबंधित भागात एनआरसी कंपनी परिसर, क्रिकेट मैदानालगतचा पट्टा, बल्याणी गाव हद्द आणि डोंगर उतार परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असल्याचा उल्लेख आहे.
विशेष म्हणजे, तक्रार प्राप्त झाल्यानंतर ८ ते १० दिवसांत कारवाई अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ प्रतीकात्मक तोडकाम झाल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे. काही ठिकाणी २०-२५ खोल्यांच्या जागी केवळ दोन-तीन खोल्यांवर कारवाई झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदारांनी जिल्हाधिकारी यांच्यासह महापालिका आयुक्तांकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
प्रभाग ‘अ’ मधील वाढत्या अनधिकृत चाळींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी स्वतः पाहणी करावी, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात आले आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त जयवंत यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही, तर उपायुक्त समिर भुमकर यांनी आपण एका आठवड्यासाठी रजेवर असल्याचे सांगितले, तर सहाय्यक आयुक्त सुषमा मंडगे यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याकडे अजून अर्ज आला नाही. अर्ज पाहून सांगते, असे उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com